मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑगस्ट, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मला व्हायचयं..........

मला व्हायचयं तो शाहूंचा समतेचा विचार, प्रतिगामी विचारांना लोळवणारा.... अन् आपल्या अस्तित्वाच्या जोरावर, समतेचा दीप सर्वत्र चेतवणारा.... मला व्हायचयं ज्योती-सावित्रीची कणखर लेक, समाजविकासासाठी दगड-धोंडे झेलणारी... अन् या गतिमान काळात निडर बनून, स्वत:चं स्वत:च्या हिंमतीवर संकट पेलणारी..... मला व्हायचयं ती बाबासाहेबांची लेखणी, मनामनांत स्वाभिमान फूलवणारी.... अन् इथल्या जातीयतेच्या वाळवंटात, समता-बंधूता-न्यायाची पेरणी करणारी.... मला व्हायचयं गाडगेबाबांची वारसदार, स्वच्छतेची पाईक असणारी.... केवळ भौतिक परिसरचं नाही तर, माणसांची मनं स्वच्छ करणारी.... मला व्हायचयं कबिराची संतवाणी, माणसांच्या बुद्धीवरचा गंज दूर करणारी.... सत्य अन् वास्तवाच्या जोरावर, अंधारलेली मनं  लख्ख उजळवणारी..... मला व्हायचयं आधूनिक स्वामी विवेकानंद, भारतीय संस्क्रुतीच्या पताका जगभर फडकवणारा.... चाँकलेट-पिझ्झा-बर्गरच्या या जमान्यात, स्वदेशी भाकरीच्या अस्तित्वाला जपणारा..... मला व्हायचयं  डाँ.नरेंद्र दाभोळकर, परंपरागत विचारांशी दंगल करणारा..... गोळ्या जरि झाडल्या सनातान्यांनी तरी,...

मला वाटतं......

मला वाटतं खडबडून जागं व्हाव तिने, अन् बनाव स्वत:चं स्वत:चा आधार.... पाँलिश्ड् मुखवट्यांच्या या दूनियेतं, इतरांवर विसंबून करू नये स्वत:ला निराधार.... मला वाटतं व्हाव तिने काळाकूट्ट काजवा, अंधारातही स्वत:चं तेज निर्माण करणारा.... होवूचं नये तिने ते मनमोहक फुलपाखरू, क्षणातचं आपलं अस्तित्व गमवणारं.... मला वाटतं व्हाव तिने  तो समतेचा विचार, शाहू-फूले-आंबेडकरांना अभिप्रेत असणारा.... उगाचचं का आचरावा तिने, पोथ्यात रमवणारा कर्मठ अन् प्रतिगामी विचार.... मला वाटतं व्हाव तिने बेशरमाचं झाड, विषारी विचारांना मूळापासून संपवणार.... का व्हाव तिने ते लाजाळूचं रोपटं? क्षणातचं आपलं अस्तित्व मिटवणारं.... मला वाटतं व्हाव तिने राकट बहिनाबाई, अन् अंकूरावी तिच्या प्रतिभेतून ओवी.... उगाचचं का वाचावीतं तिने पोथी-पूराणे, अन् का करावी आपल्या प्रतिभेची राखरांगोळी.... मला वाटतं व्हाव तिने भिमरावांची रमाई, नवऱ्याची सावली बननारी कणखर बाई.... का करावी तिने भक्तिभावाने कुटूंबाची चाकरी? जेव्हा कमावते म्हणतात,तू मोडतेसं फूकटची भाकरी....           -पोळ कोमल सविता...

जीवनमंत्र

*व. पु. काळेंची आयुष्य बदलून टाकणारी २५ वाक्ये* *१. गगनभरारीचं वेड* कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही पण गगनभरारीचं वेड हे रक्तातच असावं लागतं. कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही. *२. झुंज* वादळे जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीला घट्ट रुजून राहायचं असतं. ती जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगाने निघूनही जातात. वादळ महत्त्वाचे नसते. प्रश्न असतो कि आपण त्यांच्याशी कशी झुंज देतो आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा. *३. कॅलेंडर* भिंतीकडेच पाहत आयुष्य घालवणार्‍या रिकाम टेकड्यांना कॅलेंडर वर कुठलही चित्र चालतं.व्यक्तीमत्व घडवणार्‍या माणसांच्या बाबतीत,तारखांचे चौकोन जास्त सचित्र असतात.प्रत्येक चौकोनावर वेगळं चित्र,वेगळा विचार,वेगळी प्रगती,वेगळं शिखर. *४. संघर्ष कुठपर्यंत?* आकाशात जेव्हा एखादा कृत्रिम उपग्रह सोडतात तेव्हा गुरुत्वाकर्षणाच्या सीमेबाहेर पिटाळून लावेपर्यंत सगळा संघर्ष असतो. त्याने एकदा स्वतः गती घेतली कि उरलेला प्रवास आपोआप होतो. असंच माणसाचं आहे...समाजात विशिष्ट उंची गाठेपर्यंत जबर संघर्ष असतो. पण एकदा अपेक्षित उंचीवर पोहचलात कि आयुष्यात अनेक समस...

लढ, थांबलिस का?

......🌹 लढ, थांबलिस का? लढ, थांबलिस का? लढ, कारण तूला डोळ्यांना सुंदर भासणारी, नाजूक गुलाबकळी नाही व्हायचं... क्षणातचं आपलं अस्तित्व गमवणारी! तूला व्हायचयं, त्या गुलाबाचा काटा... स्वत:चं स्वत:च्या अस्तित्वाचं रक्षण करणारा... अन् आडव कोणी आलं तर, टचकन रूतणारा... लढ, थांबलिस का? लढ,कारण तूला ती गरिब बिचारी, गोगलगाय नाही व्हायचं.... शांतपणे आयूष्य कंठणारी!  तर ,तूला व्हायचयं,रानटी म्हैस... शत्रूला थरकापायला लावणारी... लढ, थांबलिस का? लढ,कारण तूला जन्मोजन्मी हाच पति मिळावा , म्हणून वडाला फेऱ्या मारणारी पतिव्रता नाही व्हायचं.. परंपरेची गुलामी जोपासणारी! तर ,तूला व्हायचयं, मूलींच्या शिक्षणासाठी दगडधोंडे झेलणाऱ्या , ज्योति-सावित्रीची कणखर लेक... लढ,थांबलिस का? लढ, कारण तूला मनमोहक मोर नाही व्हायचं... क्षणातचं संकटातून पळ काढणारा! तर  ,तूला व्हायचयं ,गरूड पक्षी.... असंख्य अडचणींना आव्हान देत, आकाश कवेत घेणारा... लढ,थांबलिस का? लढ,कारण तूला ती अत्याचार सहनारी, अबला नारी नाही व्हायचं... निमूटपणे आपलं अस्तित्व संपवणारी! तर ,तूला  व्हायचय,सैता...