मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मे, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

तूकोबाराय

संपूर्ण महाराष्ट्र दणाणून सोडणारी, विचारांना आणि तर्कांना प्रगल्भ करणारी, शब्दात न मावणाऱ्या संत तुकोबांशी एका वेगळ्या पातळीवरचा संवाद साधीत, दांभिकतेवर आसूड ओढणारी प्रख्यात व्याख्याते,मुक्तपत्रकार,वात्रटिकाकार कविवर्य सूर्यकांत डॊळसे यांची एक जबरदस्त मालिका वात्रटिका खास आपल्यासाठी...... तुकोबा,या नाठाळांच्या माथी काठी हाणा.... तुकोबा,होऊ नये तो सगळ्याचाच कळस झालाय. ज्याचा येऊ नये त्याचाच किळस आलाय. पूर्वी कधीच नव्हता असा भक्तीचा बाजार आहे. श्रद्धा-ब्रिद्धा सबकुछ झुठ, हा मानसिक आजार आहे. आम्ही सगळे ओळखलेय दंभाला भक्तीची रंगरंगोटी आहे. हे सगळेच नाठाळ, यांना कासेची लंगोटी नको; यांच्या बाळबुद्धीला फक्त तुम्ही नाठी म्हणा. तुकोबा,या नाठाळांच्या माथी काठी हाणा.... यांना अजून माहित नाही, बोलले तसे वागले पाहिजे. किर्तनातल्या शब्दा-शब्दाला प्रत्यक्षात जागले पाहिजे. तुमच्या भागभांडवलावरच जोरात यांचा धंदा आहे. यांच्या दर्शनासाठीही पायावरती चंदा आहे. यांची ही बाबागिरी आणि बंडलबाजी तुम्ही एकदा खोटी म्हणा. तुकोबा,या नाठाळांच्या माथी काठी हाणा.... उगीच कुणाचा...

माता रमाई....

रमाई...... .... शब्दांना उसनं अवसान नाही आणता येत आढेवेढे घेतात शब्द तुझ्यापर्यंत पोहोचण्याआधीच रडवेले होतात शब्द तू थापलेल्या गोवऱ्याभोवती थबकतात शब्द तुझ्या डोळ्यातल्या आसवासारखी सुकून जातात शब्द डॉक्टरसाहेबांच्या वाचन वेडापायी तू केलेल्या भाजी-भाकरीच्या ताटाजवळ रात्रभर उपाशी राहतात शब्द तुझ्या गंगाधराच्या प्रेताजवळ धाय मोकलून रडतात शब्द   तुझ्या फाटक्या पदरातून गळून पडतात शब्द साहेबांनी लपवलेल्या कुंकवाच्या करंड्याजवळ लालेलाल होतात शब्द तुझ्या घराभोवती वेळी-अवेळी ' डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो' ही घोषणा ऐकून निळीशार होतात शब्द माय, तू आमच्यासाठी नात्यातला भावविव्हळ ओलावा भावनांचं उचंबळून येणं म्हणजे तू अश्रूंनी सैरभैर होणं म्हणजे तू असीम  सौंदर्याचा लेणं म्हणजे तू आभाळापासून आभाळपण घेणं म्हणजे तू तू आमच्या आयुष्याचा पाया तू सर्वांसाठी आभाळाची माया तू हळवा कोपरा बाईपणाचा तू सुगंधी मोगरा माणूसपणाचा तुझं नाव घेताच शब्द कशी होतात शहाणी लहान मुलासारखी आज्ञाधारक आणि उभी राहतात शिस्तीत तुला मानवंदना देण्यासाठी तुझ्यावर कविता लिहिण...

आई

  आज जागतिक mothers day .....म्हणून आईसाठी मला भावलेल्या काही समर्पक ओळी...   माझी आई म्हणजे संस्कारी विचारांचा अक्षय आणि अभंग साठा.म्हणून तिच्या वात्सल्याला जगात  कशाचीही तोड नाही.घरातील सर्वाना प्रेमाच्या रेशमी धाग्यामध्ये गुंफणारी  शक्ती म्हणजे आई. So I love my mom. .She is my world.  आई म्हणजे ......... आई साठी काय लिहू आई साठी कसे लिहू आई साठी पुरतील एवढे शब्द नाहीत कोठे आई वरती लिहीण्याइतपत नाही माझे व्यक्तिमत्व मोठे जीवन हे शेत आई म्हणजे विहीर जीवन ही नौका तर आई म्हणजे तीर जीवन ही शाळा तर आई म्हणजे पाटी जीवन हे कामच काम तर आई म्हणजे सुट्टी आई तू उन्हामधली सावली आई तू पावसातली छत्री आई तू थंडीतली शाल आता यावीत दु:खे खुशाल आई म्हणजे मंदिराचा उंच कळस आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी आई म्हणजे वाळवंटात प्यावं असं ठंडगार पाणी आई म्हणजे आरतीत वाजवावी अशी लयबध्द टाळी आई म्हणजे वेदनेनंतरची सर्वात पहिली आरोळी........ अस्तित्वाचं इथे नांदणं आहे संस्कारांच्या असंख्य चांदण्य...

बाबा

           कसं सांगू बाबा , तूम्ही माझ्यासाठी काय आहात?            कसं सांगू मी तूम्हाला तूम्ही माझ्या ह्रूदयाचं गीत आहात...            तूम्हीचं जिंदगी अन् तूम्हीच ताजगी....           तूम्हीचं आहात माझी  प्रत्येक खूशी...          नजरेतही तूम्ही अन् विचारातही तूम्ही ...          पहाटेच्या ध्येयवेड्या स्वप्नातही तूम्हीचं....          प्रेमाने ओथंबलेल्या प्रत्येक शब्दांत  तूम्हीचं...          तूम्हीचं आहात माझा सूर्योदय अन् तूम्हीचं माझा सूर्यास्त...          तूम्हीचं आहात माझे  ध्येयवेडे  मार्गस्थ..           माझं जिंकणही तूम्हीचं आहात ....           माझं हरणही तूम्हीचं आहात....           माझ्या  ह्रदयातील गोड आठवणही तूम्हीचं आहातं......

parents and daughters

Dear Parents *Spend maximum time with your daughter/(s)* - Here is why Cute Letter from a newly married girl to her mother Dear mom, *Like every normal girl, I was excited about marriage right from my childhood days. I never thought beyond the time that I would spend happily with my prince charming.* *But today when I am married, I realize that marriage is not all roses. It’s not just about being with your beloved and having a gala time. There is so much more to it. It comes with its own share of responsibilities, duties, sacrifices and compromises*. *I can’t wake up anytime I want to*. *I am expected to be up and ready before everyone else in the family*. *I can’t laze around in my pyjamas throughout the day*. *I am expected to be presentable every time*. *I can’t just go out anytime I want to*. *I am expected to be sensitive to the needs of the family*. *I just can’t hit the bed anytime I want to*. *I am expected to be active and around the family*. *I can’t ex...

बाप..लेक

प्रत्येक बाबा ने आणि त्याच्या लेकीने वाचवी अशी सुंदर कविता ---------------------------------------------- पोरीची पसंती आली की बापाचं काळीज धडधडतं चिमणी घरटं सोडणार म्हणून आतल्या आत खूप रडतं . हसरे खेळकर बाबा एकदम धीर गंभीर दिसू लागतात पोरीला पाणी मागण्या पेक्षा स्वतःच उठून घेऊ लागतात . या घरातला चिवचीवाट आता कायमसाठी थांबणार असतो म्हणून बाप लेक झोपल्यावर तिच्याकडे पाहून रडत असतो . अंबुच्या लिंबूच्या करत करत मोठी कधी झाली कळलं नाही बाप सांगतो तिलासोडून मला पाणीही गिळलं नाही . दिवसातून एकदा तरी मायेनं जवळ घ्यावं वाटतं परक्याचं धन असलं तरी द्यायला मात्र नको वाटतं . उठल्या पासून झोपे पर्यंत बाबाची काळजी घेत असते आज ना उद्या जाणार म्हणून पोरगी जास्तच लाडाची असते . पोरगी जाणार म्हणलंकी बाप आतून तुटून जातो कळत नाही बैठकीतून अचानक का उठून जातो ? . इकडे तिकडे जाऊन बाबा गुपचूप डोळे पुसत असतात लेकीचं कल्याण झालं म्हणून पुन्हा बैठकीत हसत असतात . तिचा सगळा जीवनपट क्षणाक्षणाला आठवत राहतो डोळ्यात येणाऱ्या आसवांना बाबा वापस पाठवत राहतो . बी. पी. ची गो...

आदर्श नेता

बाबासाहेबांचं फॅशन स्टेटमेंट! डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्यक्तिमत्त्वाच्या अनेक महत्त्वपूर्ण पैलूंपैकी त्यांचं फॅशन स्टेटमेंट हे एक महत्त्वाचं अंग आहे. ते अशासाठी की त्या काळात अप टू डेट राहणारी केवळ तीनच माणसं भारतीय समाजकारणात अग्रेसर होती. पं. जवाहरलाल नेहरू, बॅ. मोहम्मद अली जीना आणि तिसरे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. या तिघांपैकी बाबासाहेब सोडले तर बाकी दोघे हे सधन कुटूंबातील. बालपण आणि तारुण्य सर्व सुखसोयी आणि संसाधनांनी भरलेल्या वातावरणात गेलं. याउलट बाबासाहेबांच्या घरी कमालीचं दारिद्र्य होतं. जातीव्यवस्थेचे,अस्पृश्यतेचे चटके अलग. तरी वकिली व्यवसायातून कमावलेल्या संपत्तीतून त्यांनी स्वतःचं एक फॅशन स्टेटमेंट तयार केलं होतं. तसे ते स्वभावाने पूर्णतः युरोपीयनच होते. पोटाला खायला मिळालं नाही तरी चालेल पण अंगावर चांगलं कापड हवं हा त्यांचा आग्रह असे. बाबासाहेबांना सिडनेहॅम कॉलेजमध्ये असताना पहिला पगार मिळाला. त्यांनी रमाईला सांगितलं की घरातल्या सर्वांना कपड्यांची मनसोक्त खरेदी करून घे. रमाईसुद्धा जिंदादील माणसाचीच सोबती. बैलगाडी भरून कपड्यांची खरेदी केली. हा भाग वेगळा की त्या वेळी बाबासाहे...