मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जुलै, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ह्रदयाचा तूकडा...

#विवाह_प्रसंग_कन्येच्य_पित्याने_केलेले_भाषण नक्की वाचा..... "  माझ्या मुलीच्या नव्या कुटुंबाला काही सांगण्याचा माझा विचार आहे . पण तसे करणे अयोग्य ठरेल कारण आता तिचे लग्न झालेले आहे आणि ती तुमच्या कुटुंबातील सदस्य बनली आहे . माझ्यावर विश्वास ठेवा , त्याबद्दल माझी कुठलीही त़र्कार नाही . उलट आता माझ्या मुलीचे पहिले प्राधान्य हे तुमचे कुटुंब असले पाहिजे . आता तिच्या आयुष्यात आमची भूमिका मागच्या सीटवर बसून फक्त बघण्याची असेल . आम्ही हे सगळे आनंदाने स्वीकारले आहे . पण आमची एक विनंती आहे . तिला आनंदात ठेवा !        "   मला खात्री आहे की , तुम्ही तिला आनंदात ठेवाल . कदाचित ती आमच्यापेक्षा तुमच्याकडे अधिक आनंदी राहील . पण प्रत्येक वडिला प्रमाणेच मला माझी मुलगी आनंदात राहावी असे वाटते . त्यामुळे मी पुन्हा पुन्हा सांगतो आहे की , तिला आनंदात ठेवा .           "  ती माझ्यासाठी कधीच ओझे नव्हती . उलट ती माझा श्वास आणि चेहऱ्यावरील हास्य आहे . मी तिचे लग्न करुन देत आहे ;  कारण ते सगळे निसर्गनियमानुसार करावेच लागते .  आपल्या स...

नकार

नकार...... येतात मूलाकडचे बघायला, अन् सुरू होतो मुलगी दाखवण्याचा प्रकार... पसंद पडली तर सुरू होतो संसार... नाहीतर पचवावा लागतो तिला, तो आलेला नकार... दू:खवले जरी भाव मनिचे, तरी काढत नाही हूंकार... होरपळले हात जरी अग्निने, तरी भासवते सर्वांस निर्विकार... प्रत्येकक्षणी करत असते ती, घरच्यांच स्वप्न साकार... अन् समाजाच्या चौकटीत, देत असते स्वत:च्या जीवना आकार... जरी भरला असेल, तिच्या आयूष्यात दू:खाचा बाजार... तरी लपवावा लागतो तिला, मनी दाटलेला विकार... अनेकवेळा बापाच्या प्रतिष्ठेसाठी, तिला बळचं द्यावा लागतो, न आवडलेल्या व्यक्तीला होकार... पण तिच्या मनी दाटलेला असतो नकार