मला व्हायचयं तो शाहूंचा समतेचा विचार,
प्रतिगामी विचारांना लोळवणारा....
अन् आपल्या अस्तित्वाच्या जोरावर,
समतेचा दीप सर्वत्र चेतवणारा....
मला व्हायचयं ज्योती-सावित्रीची कणखर लेक,
समाजविकासासाठी दगड-धोंडे झेलणारी...
अन् या गतिमान काळात निडर बनून,
स्वत:चं स्वत:च्या हिंमतीवर संकट पेलणारी.....
मला व्हायचयं ती बाबासाहेबांची लेखणी,
मनामनांत स्वाभिमान फूलवणारी....
अन् इथल्या जातीयतेच्या वाळवंटात,
समता-बंधूता-न्यायाची पेरणी करणारी....
मला व्हायचयं गाडगेबाबांची वारसदार,
स्वच्छतेची पाईक असणारी....
केवळ भौतिक परिसरचं नाही तर,
माणसांची मनं स्वच्छ करणारी....
मला व्हायचयं कबिराची संतवाणी,
माणसांच्या बुद्धीवरचा गंज दूर करणारी....
सत्य अन् वास्तवाच्या जोरावर,
अंधारलेली मनं लख्ख उजळवणारी.....
मला व्हायचयं आधूनिक स्वामी विवेकानंद,
भारतीय संस्क्रुतीच्या पताका जगभर फडकवणारा....
चाँकलेट-पिझ्झा-बर्गरच्या या जमान्यात,
स्वदेशी भाकरीच्या अस्तित्वाला जपणारा.....
मला व्हायचयं डाँ.नरेंद्र दाभोळकर,
परंपरागत विचारांशी दंगल करणारा.....
गोळ्या जरि झाडल्या सनातान्यांनी तरी,
लाखो मनांत विचारांच् बिज पेरणारा....
व्हायचचं नाही मला तो भपकेबाज संस्क्रुतीतला,
दिखाऊ अन् लाळ चाटणारा पाळीव टाँमी.....
मला व्हायचयं इतिहासातील,
महाराणा प्रतापचा चेतन घोडा.....
पोळ कोमल सविता बाळासाहेब....
प्रतिगामी विचारांना लोळवणारा....
अन् आपल्या अस्तित्वाच्या जोरावर,
समतेचा दीप सर्वत्र चेतवणारा....
मला व्हायचयं ज्योती-सावित्रीची कणखर लेक,
समाजविकासासाठी दगड-धोंडे झेलणारी...
अन् या गतिमान काळात निडर बनून,
स्वत:चं स्वत:च्या हिंमतीवर संकट पेलणारी.....
मला व्हायचयं ती बाबासाहेबांची लेखणी,
मनामनांत स्वाभिमान फूलवणारी....
अन् इथल्या जातीयतेच्या वाळवंटात,
समता-बंधूता-न्यायाची पेरणी करणारी....
मला व्हायचयं गाडगेबाबांची वारसदार,
स्वच्छतेची पाईक असणारी....
केवळ भौतिक परिसरचं नाही तर,
माणसांची मनं स्वच्छ करणारी....
मला व्हायचयं कबिराची संतवाणी,
माणसांच्या बुद्धीवरचा गंज दूर करणारी....
सत्य अन् वास्तवाच्या जोरावर,
अंधारलेली मनं लख्ख उजळवणारी.....
मला व्हायचयं आधूनिक स्वामी विवेकानंद,
भारतीय संस्क्रुतीच्या पताका जगभर फडकवणारा....
चाँकलेट-पिझ्झा-बर्गरच्या या जमान्यात,
स्वदेशी भाकरीच्या अस्तित्वाला जपणारा.....
मला व्हायचयं डाँ.नरेंद्र दाभोळकर,
परंपरागत विचारांशी दंगल करणारा.....
गोळ्या जरि झाडल्या सनातान्यांनी तरी,
लाखो मनांत विचारांच् बिज पेरणारा....
व्हायचचं नाही मला तो भपकेबाज संस्क्रुतीतला,
दिखाऊ अन् लाळ चाटणारा पाळीव टाँमी.....
मला व्हायचयं इतिहासातील,
महाराणा प्रतापचा चेतन घोडा.....
पोळ कोमल सविता बाळासाहेब....
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा