मला वाटतं खडबडून जागं व्हाव तिने,
अन् बनाव स्वत:चं स्वत:चा आधार....
पाँलिश्ड् मुखवट्यांच्या या दूनियेतं,
इतरांवर विसंबून करू नये स्वत:ला निराधार....
मला वाटतं व्हाव तिने काळाकूट्ट काजवा,
अंधारातही स्वत:चं तेज निर्माण करणारा....
होवूचं नये तिने ते मनमोहक फुलपाखरू,
क्षणातचं आपलं अस्तित्व गमवणारं....
मला वाटतं व्हाव तिने तो समतेचा विचार,
शाहू-फूले-आंबेडकरांना अभिप्रेत असणारा....
उगाचचं का आचरावा तिने,
पोथ्यात रमवणारा कर्मठ अन् प्रतिगामी विचार....
मला वाटतं व्हाव तिने बेशरमाचं झाड,
विषारी विचारांना मूळापासून संपवणार....
का व्हाव तिने ते लाजाळूचं रोपटं?
क्षणातचं आपलं अस्तित्व मिटवणारं....
मला वाटतं व्हाव तिने राकट बहिनाबाई,
अन् अंकूरावी तिच्या प्रतिभेतून ओवी....
उगाचचं का वाचावीतं तिने पोथी-पूराणे,
अन् का करावी आपल्या प्रतिभेची राखरांगोळी....
मला वाटतं व्हाव तिने भिमरावांची रमाई,
नवऱ्याची सावली बननारी कणखर बाई....
का करावी तिने भक्तिभावाने कुटूंबाची चाकरी?
जेव्हा कमावते म्हणतात,तू मोडतेसं फूकटची भाकरी....
-पोळ कोमल सविता बाळासाहेब....(dedicated to my dear dad)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा