मुख्य सामग्रीवर वगळा

लढ, थांबलिस का?


......🌹

लढ, थांबलिस का?

लढ, थांबलिस का?
लढ, कारण तूला डोळ्यांना सुंदर भासणारी,
नाजूक गुलाबकळी नाही व्हायचं...
क्षणातचं आपलं अस्तित्व गमवणारी!
तूला व्हायचयं, त्या गुलाबाचा काटा...
स्वत:चं स्वत:च्या अस्तित्वाचं रक्षण करणारा...
अन् आडव कोणी आलं तर, टचकन रूतणारा...

लढ, थांबलिस का?
लढ,कारण तूला ती गरिब बिचारी,
गोगलगाय नाही व्हायचं....
शांतपणे आयूष्य कंठणारी!
 तर ,तूला व्हायचयं,रानटी म्हैस...
शत्रूला थरकापायला लावणारी...

लढ, थांबलिस का?
लढ,कारण तूला जन्मोजन्मी हाच पति मिळावा ,
म्हणून वडाला फेऱ्या मारणारी पतिव्रता नाही व्हायचं..
परंपरेची गुलामी जोपासणारी!
तर ,तूला व्हायचयं,
मूलींच्या शिक्षणासाठी दगडधोंडे झेलणाऱ्या ,
ज्योति-सावित्रीची कणखर लेक...

लढ,थांबलिस का?
लढ, कारण तूला मनमोहक मोर नाही व्हायचं...
क्षणातचं संकटातून पळ काढणारा!
तर  ,तूला व्हायचयं ,गरूड पक्षी....
असंख्य अडचणींना आव्हान देत,
आकाश कवेत घेणारा...

लढ,थांबलिस का?
लढ,कारण तूला ती अत्याचार सहनारी,
अबला नारी नाही व्हायचं...
निमूटपणे आपलं अस्तित्व संपवणारी!
तर ,तूला  व्हायचय,सैतानांना धडा शिकवणारी,
फूलनदेवी ...

म्हणून 'बास झाल' आता ते बाह्यांग सजवणं...
जगासाठी स्वत:ला  नटवन-थटवन्...
आता तरी तू  हो तू शहाणी,
अन् बन स्वत:च्या आयूष्याची साम्राज्ञी...

      -  कोमल सविता बाळासाहेब पोळ.

टिप्पण्या