मुख्य सामग्रीवर वगळा

नकार


नकार......

येतात मूलाकडचे बघायला,
अन् सुरू होतो मुलगी दाखवण्याचा प्रकार...
पसंद पडली तर सुरू होतो संसार...
नाहीतर पचवावा लागतो तिला,
तो आलेला नकार...
दू:खवले जरी भाव मनिचे,
तरी काढत नाही हूंकार...
होरपळले हात जरी अग्निने,
तरी भासवते सर्वांस निर्विकार...
प्रत्येकक्षणी करत असते ती,
घरच्यांच स्वप्न साकार...
अन् समाजाच्या चौकटीत,
देत असते स्वत:च्या जीवना आकार...
जरी भरला असेल,
तिच्या आयूष्यात दू:खाचा बाजार...
तरी लपवावा लागतो तिला,
मनी दाटलेला विकार...
अनेकवेळा बापाच्या प्रतिष्ठेसाठी,
तिला बळचं द्यावा लागतो,
न आवडलेल्या व्यक्तीला होकार...
पण तिच्या मनी दाटलेला असतो नकार

टिप्पण्या